भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळ सारावा चिंतनें । एकांतवासीं गंगास्नानें । देवाचें पूजन । प्रदक्षणा तुळसीच्या

kal sarava chintanen | ekantavasin gangasnanen | devachen pujan | pradakshana tulasichya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काळ सारावा चिंतनें । एकांतवासीं गंगास्नानें । देवाचें पूजन । प्रदक्षणा तुळसीच्या ॥१॥ युक्त आहार वेहार । नेम इंद्रियांचा सार । नसावी बासर । निद्रा बहु भाषण ॥ध्रु.॥ परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण । व्हावया जतन । हे उपाय लाभाचे ॥२॥ देह समर्पीजे देवा । भार कांहीं च न घ्यावा । होईल आघवा। तुका म्हणे आनंद ॥३॥