भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळावरी घालूं तरि तो सरिसा । न पुरतां इच्छा दास कैसे

kalavari ghalun tari to sarisa | na puratan ichchha das kaise

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काळावरी घालूं तरि तो सरिसा । न पुरतां इच्छा दास कैसे ॥१॥ आतां नाहीं कांहीं उसिराचें काम । न खंडावें प्रेम नारायणा ॥ध्रु.॥ देणें लागे मग विलंब कां आड । गोड तरि गोड आदि अंत ॥२॥ तुका म्हणे होईल दर्शने निश्चिंती । गाईन तें गीतीं ध्यान मग ॥३॥