भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळोखी खाऊन कैवाड केला धीर । आपुलिया हितें जाले जनामध्यें शूर

kalokhi khaun kaivad kela dhir | apuliya hiten jale janamadhyen shur

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काळोखी खाऊन कैवाड केला धीर । आपुलिया हितें जाले जनामध्यें शूर ॥१॥ कां रें तुह्मी नेणां कां रे तुह्मी नेणां । अल्पसुखासाठी पडशी विपत्तीचे घाणां ॥ध्रु.॥ नाहीं ऐसी लाज काय तयांपें आगळें । काय नव्हे केलें आपुलिया बळें ॥२॥ तुका म्हणे तरी सुख अवघें चि बरें । जतन करून हे आपुलालीं ढोरें ॥३॥