भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय तुज मागें नाहीं जाणवलें । माझें नाहीं केलें हित कांहीं

kay tuj magen nahin janavalen | majhen nahin kelen hit kanhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय तुज मागें नाहीं जाणवलें । माझें नाहीं केलें हित कांहीं ॥१॥ डोळे झांकुनियां होसी अबोलणा । तेव्हां नारायणा आतां कैसा ॥ध्रु.॥ न कळे उचित न संगतां स्पष्ट । ऐसा क्रियानष्ट काय जाणे ॥२॥ तुका म्हणे माझा घात तुम्हां ठावा । तरि कां आधीं देवा वारूं नये ॥३॥