भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

इहलोकीं आम्हां भूषण अवकळा । भोपळा वाकळा आणि भिक्षा ॥१॥ निमोली संपदा भयविरहित । सर्वकाळ चित्त समाधान ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

इहलोकीं आम्हां वस्तीचें पेणें । उदासीन तेणें देहभावीं॥१॥ कार्यापुरतें कारण मारगीं । उलंघूनि वेगीं जावें स्थळा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उकिरडा आधीं अंगीं नरकाडी । जातीची ते जोडी ते चि चित्तीं ॥१॥ कासयानें देखे अंधळा माणिकें । चवीविण फिके वांयां जाय ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उखतें आयुष्य जायांचें कलेवर । अवघें वोडंबर विषयांचें ॥१॥ कोणासी हा लागे पुसणें विचार । मनें चि सादर करूं आतां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उगें चि हें मन राहातें निश्चळ । तरि कां तळमळ साठ होती ॥१॥ काय तुमचीं नेणों कवतुक विंदानें । सर्वोत्तमपणें खेळतसां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उंच निंच कैसी पाईकाची वोळी । कोण गांढे बळी निवडिले ॥१॥ स्वामिकाजीं एक सर्वस्वें तत्पर । एक ते कुचर आशाबद्ध ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उचित जाणावें मुख्य धर्म आधीं । चित्तशुद्ध बुद्धी ठायीं स्थिर ॥१॥ न घालावी धांव मनाचिये ओढी । वचन आवडी संताचिये ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

उचित तें काय जाणावें दुर्बळें । थोरिवेचें काळें तोंड देवा ॥१॥ देतों हाका कोणी नाइकती द्वारीं । ओस कोणी घरीं नाहीं ऐसें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उचित न कळे इंद्रियाचे ओढी । मुखें बडबडी शिकलें तें ॥१॥ आपण जाऊन न्यावीं नरकास । बळें बेताळीस कुळें जग ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उचिताचा काळ । साधावया युक्तिबळ । आपलें सकळ । ते प्रसंगीं पाहिजे ॥१॥ नेम नाहीं लाभ हानि । अवचित घडती दोनी । विचारूनि मनीं । पाहिजे तें प्रयोजावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उचिताचा भाग होतों राखोनियां । दिसती ते वांयां कष्ट गेले ॥१॥ वचनाची कांहीं राहे चि ना रुचि । खळाऐसें वाची कुची जालें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

उजळितां उजळे दीपकाची वाती । स्वयंभु ते ज्योति हिऱ्या अंगीं ॥१॥ अेकीं महाकष्टें मेळविलें धन । एकासी जतन दैवयोगें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम