भजनी मालिका
← भजनांकडे परत

उचित तें काय जाणावें दुर्बळें । थोरिवेचें काळें तोंड देवा

uchit ten kay janaven durbalen | thorivechen kalen tond deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उचित तें काय जाणावें दुर्बळें । थोरिवेचें काळें तोंड देवा ॥१॥ देतों हाका कोणी नाइकती द्वारीं । ओस कोणी घरीं नाहीं ऐसें ॥ध्रु.॥ आलिया अतीता शब्द समाधान । करितां वचन कायवेंचे॥२॥ तुका म्हणे तुम्हां साजे हें श्रीहरी । आम्ही निलाजिरीं नाहीं ऐसीं ॥३॥