भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

आश्चर्य या वाटे नसत्या छंदाचें । कैचे दिलें साचें करोनियां ॥१॥ दुजियाचा तंव अकळ हा भाव । कराया तो जीव साक्षी येथ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलिया ॥१॥ पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आसन शयन भोजन गोविंदें । भरलें आनंदें त्रिभुवन ॥१॥ अवघियां केली काळें तडातोडी । अवसर घडी पुरों नये ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आसुरी स्वभाव निर्दय अंतर । मानसीं निष्ठुर अतिवादी ॥१॥ याति कुळ येथें असे अप्रमाण । गुणाचें कारण असे अंगीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आहा आहा रे भाई । गंगा नव्हे जळ । वृक्ष नव्हे वड पिंपळ । तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ । श्रेष्ठ तनु देवाचिया ॥१॥ समुद्र नदी नव्हे पैं गा । पाषाण म्हणों नये लिंगा । संत नव्हती जगा । मानसा त्या सारिखे ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आहा आहा रे भाई । नमो उदासीन झाले देहभावा । आळविती देवा तया नमो ॥१॥ नमो तीर्थपंथें चालती तयांसी । येती त्यांसी बोळविती त्यां नमो ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आहा आहा रे भाई । हें अन्नदानाचें सत्र । पव्हे घातली सर्वत्र । पंथीं अवघे पंथ मात्र । इच्छाभोजनाचें आर्त पुरवावया ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

आहा आहारे भाई । तयावरी माझी ब्रीदावळी । भ्रष्ट ये कळी क्रियाहीन ॥१॥ थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी । वाणिली ते थोरी दवडा वांयां बाहेरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आहाकटा त्याचे करिती पितर । वंशीं दुराचार पुत्र झाला ॥१॥ गळे चि ना गर्भ नव्हे चि कां वांज । माता त्याची लाजलावा पापी ॥ध्रु. ॥

रचनाकार: संत तुकाराम

आहाच तो मोड वाळलियामधीं । अधीराची बुद्धि तेणें न्यायें ॥१॥ म्हणऊनि संग न करीं दुसरें । चित्त मळीन द्वारें दोड पडे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आहांच वाहांच आंत वरी दोन्ही । न लगा गडणी आम्हां तैशा ॥१॥ भेऊं नये तेथें भेडसावूं कोणा । आवरूनि मना बंद द्यावा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आहे ऐसा आतां आहे ठायीं बरा । ठेविलों दातारा उचितें त्या ॥१॥ वचनाचा भार पडिलिया शिरीं । झालें मग भारी उतरेना ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाही ऐसा मनी अनुभवावा ॥१॥ आवडी आवडी कलेंवरा कलेंवरी । वरीलें अंतरी ताळा पडे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आहे तें चि आम्ही मागों तुजपाशीं । नव्हों तुज ऐसीं क्रियानष्टें ॥१॥ न बोलावीं तों च वर्में बरें दिसे । प्रकट ते कैसे गुण करूं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम