भजनी मालिका
← भजनांकडे परत

आहारनिद्रे न लगे आदर । आपण सादर ते चि होय

aharanidre na lage adar | apan sadar te chi hoy

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आहारनिद्रे न लगे आदर । आपण सादर ते चि होय॥१॥ परमितेविण बोलणें ते वांयां । फार थोडें काया पिंड पीडी ॥ध्रु.॥ समाधान त्याचें तोचि एक जाणे । आपुलिये खुणे पावोनियां ॥२॥ तुका म्हणे होय पीडा ते न करीं । मग राहें परी भलतिये ॥३॥