भजनी मालिका
← भजनांकडे परत

आश्चर्य या वाटे नसत्या छंदाचें । कैचे दिलें साचें करोनियां

ashcharya ya vate nasatya chhandachen | kaiche dilen sachen karoniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आश्चर्य या वाटे नसत्या छंदाचें । कैचे दिलें साचें करोनियां ॥१॥ दुजियाचा तंव अकळ हा भाव । कराया तो जीव साक्षी येथ ॥ध्रु.॥ एकीं अनेकत्व अनेकीं एकत्व । प्रकृतिस्वभावत्व प्रमाणेंचि ॥२॥ तुका म्हणे करूं उगवूं जाणसी । कुशळ येविशीं तुम्ही देवा ॥३॥