भजनी मालिका
← भजनांकडे परत

आहांच वाहांच आंत वरी दोन्ही । न लगा गडणी आम्हां तैशा

ahanch vahanch ant vari donhi | na laga gadani amhan taisha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आहांच वाहांच आंत वरी दोन्ही । न लगा गडणी आम्हां तैशा ॥१॥ भेऊं नये तेथें भेडसावूं कोणा । आवरूनि मना बंद द्यावा ॥२॥ तुका म्हणे कांहीं अभ्यासावांचुनी । नव्हे हे करणी भलतीची ॥३॥