भजनी मालिका
← भजनांकडे परत

आहाच तो मोड वाळलियामधीं । अधीराची बुद्धि तेणें न्यायें

ahach to mod valaliyamadhin | adhirachi buddhi tenen nyayen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आहाच तो मोड वाळलियामधीं । अधीराची बुद्धि तेणें न्यायें ॥१॥ म्हणऊनि संग न करीं दुसरें । चित्त मळीन द्वारें दोड पडे ॥ध्रु.॥ विषासाठी सर्पां भयाभीत लोक । हें तों सकळीक जाणतसां ॥२॥ तुका म्हणे काचें राहे कुळांकुड । अवगुण तो नाड ज्याचा तया ॥३॥