भजनी मालिका
← भजनांकडे परत

आसन शयन भोजन गोविंदें । भरलें आनंदें त्रिभुवन

asan shayan bhojan govinden | bharalen ananden tribhuvan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आसन शयन भोजन गोविंदें । भरलें आनंदें त्रिभुवन ॥१॥ अवघियां केली काळें तडातोडी । अवसर घडी पुरों नये ॥ध्रु.॥ वांटणी घातले शरीराचे भाग । दुजियाचा लाग खंडियेला ॥२॥ आवडीच्या आलें आहारासी रूप । पृथक संकल्प मावळले ॥३॥ काम तरी क्रोध बुद्धी मन नासे । भ्रमाचे वोळसे गिळिले शांती ॥४॥ तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग । बैसला अभंग एकविध ॥५॥