भजनी मालिका
← भजनांकडे परत

उचित जाणावें मुख्य धर्म आधीं । चित्तशुद्ध बुद्धी ठायीं स्थिर

uchit janaven mukhya dharma adhin | chittashuddha buddhi thayin sthir

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उचित जाणावें मुख्य धर्म आधीं । चित्तशुद्ध बुद्धी ठायीं स्थिर ॥१॥ न घालावी धांव मनाचिये ओढी । वचन आवडी संताचिये ॥२॥ अंतरीं या राहे वचनाचा विश्वास । न उगे उपदेश तुका म्हणे ॥