भजनी मालिका
← भजनांकडे परत

उंच निंच कैसी पाईकाची वोळी । कोण गांढे बळी निवडिले

unch ninch kaisi paikachi voli | kon gandhe bali nivadile

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उंच निंच कैसी पाईकाची वोळी । कोण गांढे बळी निवडिले ॥१॥ स्वामिकाजीं एक सर्वस्वें तत्पर । एक ते कुचर आशाबद्ध ॥ध्रु.॥ प्रसंगावांचूनि आणिती आयुर्भाव । पाईक तो नांव मिरवी वांयां ॥२॥ गणतीचे एक उंच निंच फार । तयांमध्यें शूर विरळा थोडे ॥३॥ तुका म्हणे स्वामी जाणे त्यांचा मान । पाईक पाहोन मोल करी ॥४॥