भजनी मालिका
← भजनांकडे परत

इनामाची भरली पेठ । वाहाती दाट मारग

inamachi bharali peth | vahati dat marag

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
इनामाची भरली पेठ । वाहाती दाट मारग ॥१॥ अवघेची येती वाण । अवघे शकुन लाभाचे ॥ध्रु.॥ अडचणी त्या केल्या दुरी । देण्या उरी घेण्याच्या ॥२॥ तुका म्हणे जोडी झाली । ते आपुली आपणा ॥३॥