भजनी मालिका
← भजनांकडे परत

उखतें आयुष्य जायांचें कलेवर । अवघें वोडंबर विषयांचें

ukhaten ayushya jayanchen kalevar | avaghen vodambar vishayanchen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उखतें आयुष्य जायांचें कलेवर । अवघें वोडंबर विषयांचें ॥१॥ कोणासी हा लागे पुसणें विचार । मनें चि सादर करूं आतां ॥ध्रु.॥ उत्पत्ति प्रळय पडिलें दळण । पाकाचें भोजन बीज वाढे ॥२॥ तुका म्हणे जाऊं अभयाच्या ठायां । रिघों देवराया शरण वेगीं ॥३॥