भजनी मालिका
← भजनांकडे परत

इंद्रियांसी नेम नाहीं । मुखीं राम म्हणोनि काई

indriyansi nem nahin | mukhin ram mhanoni kai

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
इंद्रियांसी नेम नाहीं । मुखीं राम म्हणोनि काई ॥१॥ जेविं मासीसंगें अन्न । सुख नेदी तें भोजन ॥ध्रु.॥ कीर्तन करावें । तैसें करूनी दावावें ॥२॥ हें तों अंगीं नाहीं चिन्हें । गाइलें वेश्येच्या ढव्यानें ॥३॥ तुका म्हणे रागा । संत शिवूं नेदिती अंगा ॥४॥