भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

आम्ही बळकट झालों फिराउनी । तुमच्या वचनीं तुम्हां गोऊं ॥१॥ जालें तुम्हां मागील तें मागें । आतां वर्मलागें ठावे जाले ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हीं भाव जाणों देवा । न कळती तुझिया मावा । गणिकेचा पुढावा । पतना न्यावा दशरथ ॥१॥ तरी म्या काय गा करावे । कोण्या रीती तुज पावावे । न सांगतां ठावे । तुम्हां विण न पडे॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही भाविकें हे काय जाणों खोडी । आइकोनि प्रौढी विनविलें ॥१॥ नाहीं ऐसें येथें झालेती असतां । वाढविली चिंता अधिक सोस ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही मागों ऐसें नाहीं तुजपाशीं । जरीं तूं भीतोसि पांडुरंगा ॥१॥ पाहें विचारूनि आहे तुज ठावें । आम्ही धालों नावें तुझ्या एका ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही मेलों तेव्हां देह दिला देवा । आतां करूं सेवा कोणाची मी ॥१॥ सूत्रधारी जैसा हालवितो कळा । तैसा तो पुतळा नाचे छंदें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही म्हणों कोणी नाहीं तुज आड । दिसतोसी भ्याड पांडुरंगा ॥१॥ हागे माझ्या भोगें केलासी परता । विश्वंभरीं सत्ता नाहीं ऐसी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही विठ्ठलाचे दास झालों आतां । न चलेचि सत्ता आणिकांची ॥१॥ नावरे तयासी ऐसें नाहीं दुजें । करितां पंढरिराजें काय नव्हे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही वीर झुंझार । करूं जमदाढे मार । थापटिले भार । मोड जाला दोषांचा ॥१॥ जाला हाहाकार । आले हांकीत झुंझार । शंखचक्रांचे शृंगार । कंठीं हार तुळसीचे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही वैकुंठवासी । आलों या चि कारणासी । बोलिले जे ॠषी । साच भावें वर्ताया ॥१॥ झाडूं संतांचे मारग । आडरानें भरलें जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरलें तें सेवूं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही शक्तीहीनें । कैसें कराल तें नेणें । लिगाडाच्या गुणें । खोळंबला राहिलों ॥१॥ माझें मज देई देवा । असे ठेविला तो ठेवा । नाहीं करीत हेवा । कांहीं अधीक आगळा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही सदैव सुडके । जवळीं येतां चोर धाके । जाऊं पुडी भिकें । कुतरीं घर राखती ॥१॥ नांदणूक ऐसी सांगा । नाहीं तरी वांयां भागा । थोरपण अंगा । तरी ऐसें आणावें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही सर्वकाळ कैंचीं सावधान । व्यवसायें मन अभ्यासलें ॥१॥ तरी म्हणा मोट ठेविली चरणीं । केलों गुणागुणीं कासावीस ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही हरीचे सवंगडे जुने ठायींचे वेडे बागडे । हातीं धरुनी कडे पाठीसवें वागविलों ॥१॥ म्हणोनि भिन्न भेद नाहीं ।देवा आम्हां एकदेहीं । नाहीं जालों कहीं। एका एक वेगळे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आयुष्य मोजावया बैसला मापारी । तूं कां रे वेव्हारी संसाराचा ॥१॥ नेईल ओढोनि ठाउकें नसतां । न राहे दुश्चिता हरीविण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आरुश माझी वाणी बोबडीं उत्तरें । केली ते लेकुरें सलगी पायीं ॥१॥ करावें कवतुक संतीं मायबापीं । जीवन देउनि रोपीं विस्तारिजे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आरुष शब्द बोलों मनीं न धरावें कांहीं । लडिवाळ बाळकें तूं चि आमुचि आई ॥१॥ देई गे विठाबाई प्रेमभातुकें । अवघियां कवतुकें लहानां थोरां सकळां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आरुषा वचनीं मातेची आवडी । म्हणऊनि तांतडी घेती नाहीं ॥१॥ काय होईल माझें मांडिलें कवतुक । आदराची भूक रडारोवी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम