भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही भांडों तुजसवें । वर्मी धरूं जालें ठावें

amhi bhandon tujasaven | varmi dharun jalen thaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही भांडों तुजसवें । वर्मी धरूं जालें ठावें ॥१॥ होसी सरड बेडुक । वाघ गाढ्याही पाईक ॥ध्रु.॥ बळ करी तया भ्यावें । पळों लागे तया घ्यावें ॥२॥ तुका म्हणे दूर परता । नर नारी ना तूं भूता ॥३॥