भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही हरीचे सवंगडे जुने ठायींचे वेडे बागडे । हातीं धरुनी कडे पाठीसवें वागविलों

amhi hariche savangade june thayinche vede bagade | hatin dharuni kade pathisaven vagavilon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही हरीचे सवंगडे जुने ठायींचे वेडे बागडे । हातीं धरुनी कडे पाठीसवें वागविलों ॥१॥ म्हणोनि भिन्न भेद नाहीं ।देवा आम्हां एकदेहीं । नाहीं जालों कहीं। एका एक वेगळे ॥ध्रु.॥ निद्रा करितां होतों पायीं। सवें चि लंका घेतली तई । वान्नरें गोवळ गाई। सवें चारित फिरतसों ॥२॥ आम्हां नामाचें चिंतन ।राम कृष्ण नारायण। तुका म्हणे क्षण खातां जेवितां न विसंबो ॥३॥