भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही शक्तीहीनें । कैसें कराल तें नेणें । लिगाडाच्या गुणें । खोळंबला राहिलों

amhi shaktihinen | kaisen karal ten nenen | ligadachya gunen | kholambala rahilon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही शक्तीहीनें । कैसें कराल तें नेणें । लिगाडाच्या गुणें । खोळंबला राहिलों ॥१॥ माझें मज देई देवा । असे ठेविला तो ठेवा । नाहीं करीत हेवा । कांहीं अधीक आगळा ॥ध्रु.॥ नाहीं गळां पडलों झोंड । तुमचें तें चि माझें तोंड । चौघां चार खंड । लांबणी हे अनुचित ॥२॥ नाहीं येत बळा । आतां तुह्मासी गोपाळा । तुका म्हणे गळा । उगवा पायां लागतों ॥३॥