भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही म्हणों कोणी नाहीं तुज आड । दिसतोसी भ्याड पांडुरंगा

amhi mhanon koni nahin tuj ad | disatosi bhyad panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही म्हणों कोणी नाहीं तुज आड । दिसतोसी भ्याड पांडुरंगा ॥१॥ हागे माझ्या भोगें केलासी परता । विश्वंभरीं सत्ता नाहीं ऐसी ॥ध्रु.॥ आम्ही तुज असों देऊनि आधार । नाम वारंवार उच्चारितों ॥२॥ तुका म्हणे मज धरियेलें काळें । पंचभूतीं खळें करूनियां ॥३॥