भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही बळकट झालों फिराउनी । तुमच्या वचनीं तुम्हां गोऊं

amhi balakat jhalon phirauni | tumachya vachanin tumhan goun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही बळकट झालों फिराउनी । तुमच्या वचनीं तुम्हां गोऊं ॥१॥ जालें तुम्हां मागील तें मागें । आतां वर्मलागें ठावे जाले ॥ध्रु.॥ तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध । शुद्धापाशीं शुद्ध बुद्ध व्हावें ॥२॥ तुका म्हणे आम्हां आत्मत्वाची सोय । आपण चि होय तैसा चि तूं ॥३॥