भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

आमुप जोडल्या सुखाचिया रासी । पार त्या भाग्यासी नाहीं आतां ॥१॥ काय सांगों सुख झालें आलिंगन । निवाली दर्शनें कांति माझी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हां अराणूक संवसार हातीं । पडिली नव्हती आजीवरी ॥१॥ पुत्रदाराधन होता मनी धंदा । गोवियेलों सदा होतों कामे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हां अळंकार मुद्रांचे शृंगार । तुळसीचे हार वाहों कंठीं ॥१॥ लाडिके डिंगर पंढरिरायाचे । निरंतर वाचे नामघोष ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हां आपुलें नावडे संचित । चरफडी चित्त कळवळ्यानें ॥१॥ न कळतां जाला खोळंब मारगा । जगीं जालों जगा बहुरूपी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हां आम्ही आतां वडील धाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ॥१॥ फावला एकांत एकविध भाव । हरी आम्हांसवें सर्व भोगी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हां एकविधा पुण्य सर्वकाळ । चरणकमळ स्वामीचे ते ॥१॥ चित्ताचे संकल्प राहिलें चळण । आज्ञा ते प्रमाण करुनी असों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हां घरीं एक गाय दुभता हे । पान्हा न समाये त्रिभुवनीं ॥१॥ वान ते सांवळी नांव ते श्रीधरा । चरे वसुंधरा चौदा भुवनें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हां घरीं धन शब्दाचीं रत्नें । शब्दाचीं शस्त्रें यत्न करूं ॥१॥ शब्द चि आमुच्या जीवाचें जीवन । शब्दें वांटूं धन जनलोकां ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हां देणें धरा सांगतों तें कानीं । चिंता पाय मनीं विठोबाचे ॥१॥ तेणें माझें चित्ता होय समाधान । विलास मिष्टान्न न लगे सोनें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हां निकट वासें । कळों आलें जैसें तैसें । नाहीं अनारीसें । कान्होबाचे अंतरीं ॥१॥ पीडती आपुल्या भावना । जैसी जयाची वासना । कर्माचा देखणा । पाहे लीळा कौतुक ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हां भय धाक कोणाचा रे पाहें । काळ मशक काय मानव हे ॥१॥ आम्हांसी ते काय चिंता या पोटाची । माउली आमुची पांडुरंग ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हां भाविकांची जाती । एकविध जी श्रीपती । अळंकारयुक्ति । सरों शके चि ना ॥१॥ जाणें माउली त्या खुणा । क्षोभ उपजों नेदी मना । शांतवूनि स्तना । लावीं अहो कृपाळे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम