भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां घरीं एक गाय दुभता हे । पान्हा न समाये त्रिभुवनीं

amhan gharin ek gay dubhata he | panha na samaye tribhuvanin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हां घरीं एक गाय दुभता हे । पान्हा न समाये त्रिभुवनीं ॥१॥ वान ते सांवळी नांव ते श्रीधरा । चरे वसुंधरा चौदा भुवनें ॥ध्रु.॥ वत्स नाहीं माय भलत्या सवें जाय । कुर्वाळी तो लाहे भावभरणा ॥२॥ चहूं धारीं क्षीर वोळली अमुप । धाले सनकादिक सिद्ध मुनी ॥३॥ तुका म्हणे माझी भूक तेथें काय । जोगाविते माय तिन्ही लोकां ॥४॥