भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां अवघें भांडवल । येथें विठ्ठल एकला

amhan avaghen bhandaval | yethen viththal ekala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हां अवघें भांडवल । येथें विठ्ठल एकला ॥१॥ कायावाचामनोभावें । येथें जीवें वेचलों ॥ध्रु.॥ परतें कांहीं नेणें दुजें। तत्त्वबीजें पाउलें ॥२॥ तुका म्हणे संतसंगें । येणें रंगें रंगलों ॥३॥