भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां अळंकार मुद्रांचे शृंगार । तुळसीचे हार वाहों कंठीं

amhan alankar mudranche shrungar | tulasiche har vahon kanthin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हां अळंकार मुद्रांचे शृंगार । तुळसीचे हार वाहों कंठीं ॥१॥ लाडिके डिंगर पंढरिरायाचे । निरंतर वाचे नामघोष ॥ध्रु.॥ आम्हां आणिकांची चाड चित्ती नाहीं । सर्व सुखें पायीं विठोबाच्या ॥२॥ तुका म्हणे आम्ही नेघों या मुक्ती । एकाविण चित्तीं दुजें नाहीं ॥३॥