भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हीं भाव जाणों देवा । न कळती तुझिया मावा । गणिकेचा पुढावा । पतना न्यावा दशरथ

amhin bhav janon deva | na kalati tujhiya mava | ganikecha pudhava | patana nyava dasharath

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हीं भाव जाणों देवा । न कळती तुझिया मावा । गणिकेचा पुढावा । पतना न्यावा दशरथ ॥१॥ तरी म्या काय गा करावे । कोण्या रीती तुज पावावे । न सांगतां ठावे । तुम्हां विण न पडे॥ध्रु.॥ दोनी फाकविल्या वाटा । गोवा केला घटापटा । नव्हे धीर फांटा । आड राने भरतीं ॥२॥ तुका म्हणे माझे डोळे । तुझे देखती हे चाळे । आतां येणे वेळे । चरण जीवे न सोडीं ॥३॥