भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

सुखें होतो कोठे घेतली सुती । बांधविला गळा आपुले हातीं ॥१॥ काय करूं बहु गुंतलों आतां । नयेचि सरतां मागें पुढें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सुगरणीबाईं थिता नास केला । गुळ तो घातला भाजीमध्यें ॥१॥ क्षीरीमध्यें हिंग दुधामध्यें बोळ । थितें चि वोंगळ नाश केला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सुटायाचा कांहीं करितो उपाय । तों हे देखें पाय गोवियेले ॥१॥ ऐसिया दुःखाचे सांपडलों संदी । हारपली बुद्धी बळ माझें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सुंदर अंगकांती मुखें भाळ सुरेख । बाणली उटी अंगीं टिळा साजिरा रेख । मस्तकीं मुगुट कानीं कुंडलां तेज फांके। आरक्त दंत हिरे कैसे शोभले निके ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

सुंदर मुख साजिरें कुंडलें मनोहर गोमटीं वो । नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटीं वो । विशाळ व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठीं वो । कास पीतांबराची चंदन सुगंध साजे उटी वो ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

सुदिन सुवेळ तुझा गोंधळ वो । पंच प्राण दिवटे दोनी नेत्रांचे हिलाल वो ॥१॥ पंढरपुरनिवासे तुझे रंगी नाचत असें वो । नवस पुरवीं माझा मनिंची जाणोनियां इच्छा वो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सुरवर येती तीर्थे नित्यकाळ । पेंठ त्या निर्मळ चंद्रभागा ॥१॥ साक्षभूत नव्हे सांगितली मात । महिमा अत्यद्भुत वर्णवेना ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सुराणीचीं झालों लाडिकीं एकलीं । वडील धाकुलीं आम्ही देवा ॥१॥ म्हणऊनि कांहीं न घडे अव्हेर । गोमटें उत्तर भातुकें ही ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सुलभ कीर्तनें दिलें ठसावूनि । करितां धरणी उरी कोण ॥१॥ आतां न टळावें केलिया नेमासी । उदाराचा होसी हीन काय ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सूकरासी विष्ठा माने सावकास । मिष्टान्नाची त्यास काय गोडी ॥१॥ तेवीं अभक्तांसी आवडे पाखांड । न लगे त्यां गोड परमार्थ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सेजेचा एकांत आगीपाशीं कळे । झांकिलिया डोळे अधःपात ॥१॥ राहो अथवा मग जळो अगीमधीं । निवाडु तो आधीं होऊनि गेला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सेत आलें सुगी सांभाळावे चारी कोण । पिका आलें परी केलें पाहिजे जतन ॥१॥ सोंकरीं सोंकरीं सोहंकरी विसावा तों वरी । नकोउभें आहे तों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम