भजनी मालिका
← भजनांकडे परत

सेत करा रे फुकाचें । नाम विठोबारायाचें

set kara re phukachen | nam vithobarayachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सेत करा रे फुकाचें । नाम विठोबारायाचें ॥१॥ नाहीं वेठी जेवा सारा । जाहाती नाहीं म्हणियारा । सरिक नाहीं रे दुसरा । धनी सारा तुझा तूं ॥ध्रु.॥ जपतप नांगरणी । न लगे आटी दुनवणी ॥२॥ कर्म कुळवणी ॥ न लगे धर्मपाळी दोन्ही ॥३॥ ज्ञानपाभारी ती फणी । न लगे करावी पेरणी ॥४॥ बीज न लगे संचिताचें । पीक पिकलें ठायींचे ॥५॥ नाहीं यमाचें चोरटें । विठ्ठल पागोऱ्याच्या नेटें ॥६॥ पीक न वजे हा भरवसा । करी उद्वेग तो पिसा ॥७॥ सराई सर्व काळ । वांयां न वजे घटिकापळ ॥८॥ प्रेम पिकलें अपार । नाहीं सांठावावया थार ॥९॥ ऐसीये जोडी जो चुकला । तुका म्हणे धिग त्याला ॥१०॥