भजनी मालिका
← भजनांकडे परत

सेजेचा एकांत आगीपाशीं कळे । झांकिलिया डोळे अधःपात

sejecha ekant agipashin kale | jhankiliya dole adhahpat

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सेजेचा एकांत आगीपाशीं कळे । झांकिलिया डोळे अधःपात ॥१॥ राहो अथवा मग जळो अगीमधीं । निवाडु तो आधीं होऊनि गेला ॥ध्रु.॥ भेणें झडपणी नाहीं येथें दुजें । पादरधिटा ओझें हतियारें ॥२॥ तुका म्हणे मज नाहीं जो भरवसा । तोवरी सहसा निवाड तो ॥३॥