भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुलभ कीर्तनें दिलें ठसावूनि । करितां धरणी उरी कोण

sulabh kirtanen dilen thasavuni | karitan dharani uri kon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुलभ कीर्तनें दिलें ठसावूनि । करितां धरणी उरी कोण ॥१॥ आतां न टळावें केलिया नेमासी । उदाराचा होसी हीन काय ॥ध्रु.॥ एका नेमें कोठें दुसरा पालट । पादर तो धीट म्हणती त्यासी ॥२॥ तुका म्हणे किती बोलसील उणें । एकाच वचनें खंड करीं ॥३॥