भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

मुक्ति येती धांवोनियां । प्रीती वरावया हरिभक्तां ॥१॥ रिध्दी सिध्दी वोळगे येती । समागम इच्छिती पुरुषार्थ ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मुख्य महाविष्णु चैतन्याचें मूळ । सांप्रदाय फळ तथोनियां ॥१॥ हंसरुपी ब्रम्हा उपदेशी श्रीहरी । चतुश्लोकी चारी भागवत ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मूळ डाळ बीजीं अवघे शाखा पल्लव । फळीं पुष्पीं विस्तारला परि तेंचि सर्व ॥१॥ तैसा एक बीजरुप विटेवरी उभा । विश्वाकारें प्रगटला व्यापूनियां नभा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मृत प्राणी ते जीवविले । पुरुषहीं केले स्त्रियांचे ॥१॥ हे तों तुमची सहजस्थिती । लोकांसी भक्ति प्रगटावया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मृत्युची अवस्था नेणेंचि अमृत नेणेचि अमृत । पीडा भाग्यवंत दरिद्राची ॥१॥ तैसें तुम्ही नेणा आमुचे तळमळे । भोगितां सोहळे आपुलेचि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मेळवितांचि हातीं हात । आसुडिले ते अकस्मात । हें देखोनियां लोक समस्त । ठेले विस्मित अवलोकिती ॥१॥ एक एका धरितीं करीं । दाविती चिकाटियाच्या परी । दंडिमुडपी उरीं शिरीं । मारिती धडका परस्‍परें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मोडियेला धनुर्याग । हाहाकार झाला मग । आला आला रे श्रीरंग । बंधू बिळिरामा समवेत ॥१॥ आले ग्रामव्दारापाशीं । धांविले सकळहि नगरवासी । कृष्णरामाच्या सौंदर्यासी । पहावया उतावेळ ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मोलें विकें स्वाभावगुणीं । येरवी तीतें न पुसे कोणी ॥१॥ हिंगा दुर्गधीची मोल । तेणेंविण तो अवघा फोल ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

म्हणती आजि वांचिलों जीवें । जवळी श्रीहरी होतां सवें । तंव ते गांईचे मेळावें । वाडियाकडें मोहरले ॥१॥ मग ते चालिले गोवर । वाजवीत वादयें खेळत खेळ । शिंगें कहाळा घागरघोळ । चांदिवे ध्वज उभारुनी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

म्हणती कृष्ण आवडे कैसा । जीवप्राण का पढिये जैसा । एकी म्हणती गे मानसा । भुलवाणाचि सुंदरपणें ॥१॥ यातें पाहों जातां दिठी । पहाते पहाणेंचि नुरें शेवटीं । संचरोनियां हा पाठीपोटीं । करी आपणासारिखें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

म्हणती दसवंतीये देख देख । वोजे पाहे याचें मुख । लोणीं माखलें साजूक । आणि दहींही गिरबडलें ते वरी ॥१॥ पाहे यशोदा जंव निर्धारी । तंव माग देखे मुखावरी । मग झडपिती अवघ्या नारी । कैसें बोलत होतीसी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा