भजनी मालिका
← भजनांकडे परत

मृत्युची अवस्था नेणेंचि अमृत नेणेचि अमृत । पीडा भाग्यवंत दरिद्राची

mrutyuchi avastha nenenchi amrut nenechi amrut | pida bhagyavant daridrachi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मृत्युची अवस्था नेणेंचि अमृत नेणेचि अमृत । पीडा भाग्यवंत दरिद्राची ॥१॥ तैसें तुम्ही नेणा आमुचे तळमळे । भोगितां सोहळे आपुलेचि ॥२॥ सिंधु काय जाणे तहानेचि बाधा । पयोनिधि क्षुघा कैसी असे ॥३॥ निळा म्हणे रवी न देखे अंधारें । उष्मा सुधाकारें कवणे काळीं ॥४॥