मागें पुढे उभा राहे । भरुनि पाहे डोळे त्या
magen pudhe ubha rahe | bharuni pahe dole tya
मागें पुढे उभा राहे । भरुनि पाहे डोळे त्या ॥१॥ प्रेमासी दृष्टी लागेल झणें । उतरीं निंबलोण वरुनियां ॥२॥
magen pudhe ubha rahe | bharuni pahe dole tya
मागें पुढे उभा राहे । भरुनि पाहे डोळे त्या ॥१॥ प्रेमासी दृष्टी लागेल झणें । उतरीं निंबलोण वरुनियां ॥२॥
magen bahutansi vantilen | pudhen anikanhi thevalen | bhaven vishvasite pavale | adhikariya didhale adhikar
मागें बहुतांसि वांटिलें । पुढें आणिकांहि ठेवलें । भावें विश्वासिते पावले । अधिकारिया दिधले अधिकार ॥१॥ चतुरा चतुरशिरोमणी । सकळां जाणतियांचा धणी । करुं जाणतो वांटणी । भाग जैसें त्यापरी ॥२॥
majhaya mipanacha karoni pharal | uralen khavayasi baisala sakal | aisa bhukalu ha nandacha goval | yasi na purechi grasitan majha khel vo
माझया मीपणचा करोनि फराळ । उरलें खावयासी बैसला सकळ । ऐसा भुकाळु हा नंदाचा गोवळ । यासि न पुरेचि ग्रासितां माझा खेळ वो ॥१॥ आतां काय देऊं नसंता जवळी । संचितप्रारब्ध तें भक्षिले समुळीं । कर्माकर्माच्या घेतल्या कवळी । विषयवासना त्या ग्रासिल्या निमिषमेळिं वो ॥२॥
majha bol khara chal khara | mati vistara phankavili
माझा बोल खरा चाल खरा । मती विस्तारा फांकविली ॥१॥ विठ्ठल देवें केली कृपा । दाविला सोपा निज पंथ ॥२॥
majha vitho navhechi taisa | udarapanen jyacha thasa
माझा विठो नव्हेचि तैसा । उदारपणें ज्याचा ठसा ॥१॥ नामाचि एक स्मरल्यासाठी । गणिका बैसविली वैकुंठी ॥२॥
majhiya bhavachen khandan | navhe aisen kara dan | mukhi nam tumachen smaran | raho charanavarin drushti
माझिया भावाचें खंडण । नव्हे ऐसें करा दान । मुखी नाम तुमचें स्मरण । राहो चरणावरीं दृष्टी ॥१॥ आणखी मी न मागें कांहीं । वसो प्रेम तुमच्या ठायीं । करुनि कृपा आठव देई । आवडी कीर्तनीं सर्वदां ॥२॥
majhiya manen dharila vishvas | tumachya namin ghatali kas | nahin upeksha ani alas | tumachya thayin sharanangat
माझिया मनें धरिला विश्वास । तुमच्या नामीं घातली कास । नाहीं उपेक्षा आणि आळस । तुमच्या ठायीं शरणांगत ॥१॥ बहुतां सांभाळिलें देवा । केला बहुतांचा कुडावा । बहुतां दानें वाढल्या सेवा । बहुतां स्थपिलें निजपदीं ॥२॥
majhiye manin baisala hari | nayanamajharin kondala
माझिये मनीं बैसला हरी । नयनामाझारीं कोंदला ॥१॥ भरोनियां मना बुध्दी । राहिला संधीं इंद्रियांच्या ॥२॥
majhiye manin vishranti vate | dekhatan gomate vite charan
माझिये मनीं विश्रांती वाटे । देखतां गोमटे विटे चरण ॥१॥ तुळशीमाळा शोभल्या कंठी । प्रकाश मुगुटीं रत्नांचा ॥२॥
majhiye manicha phitala beho | dekhatachi naho rukminicha
माझिये मनीचा फिटला बेहो । देखताचि नाहो रुक्मीणीचा ॥१॥ कळिकाळ ते काय बापुडें रंक । होऊनि मशक ठेलें पुढें ॥२॥
majhiye vachesi nahin dhir | prasavate bhar aksharanche
माझिये वाचेसी नाहीं धीर । प्रसवते भार अक्षरांचे ॥१॥ तुमचे कृपेचा हा महिमा । पुरुषोत्तमा अगाध ॥२॥
majhi puja henchi archan | tumachen namasankirtan | nenen karun vedadhyayan | nenen asan yogachen
माझी पूजा हेंचि अर्चन । तुमचें नामसंकीर्तन । नेणें करुं वेदाध्ययन । नेणें आसन योगाचें ॥१॥ म्हणोनि येतों काकुलती । अत्यंत मूढ आहे माझी मती । नेणें करुं तुमची स्तुती । अहो जगत्पती पुराणपुरुषा ॥२॥
majhi budhdi jhali vedi | didhali budi harinamin
माझी बुध्दि झाली वेडी । दिधली बुडी हरिनामीं ॥१॥ नुमजे येथें विगुंतली । न करी बोली आणिक ॥२॥
majhi majachi vo padiyali bhuli | gelen maryada vo visaroni apuli | yachi anumatra padatanchi sauli | vrutti tadakar houniyan theli vo
माझी मजचि वो पडियली भुली । गेलें मर्यादा वो विसरोनि आपुली । याची अणुमात्र पडतांचि साउली । वृत्ति तदाकार होऊनियां ठेली वो ॥१॥ आलें वाचें तेंचि करितें बडबड । नये भ्रांतीचें वो वस्त्र दृष्टी आड । मना आलें तैसा नाचतें धुमाड । नेणों काय पुढें आरंभला नाड वो ॥२॥
majhiya mana samadhan | dayaven vachan abhayachen
माझीया मना समाधान । दयावें वचन अभयाचें ॥१॥ निर्भय तेणें राहेन सुखें । हरिनाम मुखें आळवित ॥२॥
majhe bol navhati phol | janen viththal antarinche
माझे बोल नव्हती फोल । जाणें विठ्ठल अंतरींचे ॥१॥ पुरवील तोचि मनींचा हेत । येईल धांवत करुणाब्धी ॥२॥
majhen majachi vo atudalen guj | nahin anikanche kama alen kaj | sandili laukikachi baren jhalen laj | tenen ladhaliye nijachenhi nij vo
माझें मजचि वो आतुडलें गुज । नाहीं आणिकांचे कामा आलें काज । सांडिली लौकिकाची बरें झालें लाज । तेणें लाधलीये निजाचेंही निज वो ॥१॥ पडिली गांठी या गुणसवें । एकनिष्ठ वो शरण जातां भावें । मनीचें राखतां वो आर्त नित्य नवे । झाला प्रसन्न हा देवाचाही देव वो ॥२॥
majhe mastak tujhaya payin | aisen kari ga vithabai
माझे मस्तक तुझया पायीं । ऐसें करी गा विठाबाई ॥१॥ अहर्निशीं तुझें ध्यान । मुखें नामसंकीर्तन ॥२॥
majhen majhe hatin hit | didhalen santamunishvarin
माझें माझे हातीं हीत । दिधलें संतमुनिश्वरीं ॥१॥ काय उत्तीर्ण होऊं कैसा । उपकारें आकाशा झांकोळिलें ॥२॥
majhenchi maj naval vate | michi bheten majalagin
माझेंचि मज नवल वाटे । मीचि भेटें मजलागीं ॥१॥ निजात्मबोधें उदो केला । प्रकाश दाटला कोंदोनी ॥२॥