भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझी बुध्दि झाली वेडी । दिधली बुडी हरिनामीं

majhi budhdi jhali vedi | didhali budi harinamin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
माझी बुध्दि झाली वेडी । दिधली बुडी हरिनामीं ॥१॥ नुमजे येथें विगुंतली । न करी बोली आणिक ॥२॥ सांडियले वादावाद । छंद बंद आणिक ॥३॥ निळा म्हणे तुमच्या पायीं । जडली ठायीं न ढळेसी ॥४॥