भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागें बहुतांसि वांटिलें । पुढें आणिकांहि ठेवलें । भावें विश्वासिते पावले । अधिकारिया दिधले अधिकार

magen bahutansi vantilen | pudhen anikanhi thevalen | bhaven vishvasite pavale | adhikariya didhale adhikar

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मागें बहुतांसि वांटिलें । पुढें आणिकांहि ठेवलें । भावें विश्वासिते पावले । अधिकारिया दिधले अधिकार ॥१॥ चतुरा चतुरशिरोमणी । सकळां जाणतियांचा धणी । करुं जाणतो वांटणी । भाग जैसें त्यापरी ॥२॥ एका वर्णाश्रमधर्में । एका यज्ञादिका कर्में । एका वेदाध्ययननेमें । एक चतुर्थाश्रमें संन्यासें ॥३॥ एका नामस्मरणमात्रें । एका पढतां स्तवनें स्तोत्रें । एका गुणानुवादचरित्रें । वर्णिता हा तोषला ॥४॥ एका ध्यानें समजाविलें । एका पूजनेंचि वारिलें । एका जपें बुझाविलें । एका स्थापिलें योगावरी ॥५॥ एका तीथें यात्रागमनें । एका ब्रम्हचर्यादि अनुष्ठानें । एका व्रतें पुरश्चरणें । गृहस्थाश्रमें वानप्रस्थें ॥६॥ निळा म्हणे हा सर्व जाणे । सर्वसाक्षी सर्वज्ञपणें । जयापरि तैसें देणें । करी हा उणें नाहीं यासी ॥७॥