भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझिये मनीं बैसला हरी । नयनामाझारीं कोंदला

majhiye manin baisala hari | nayanamajharin kondala

रचनाकार: संत निळोबा · अभंग
माझिये मनीं बैसला हरी । नयनामाझारीं कोंदला ॥१॥ भरोनियां मना बुध्दी । राहिला संधीं इंद्रियांच्या ॥२॥ पाहे तेथें आपणचि दिसे । स्वरुप विलसे पदार्थी ॥३॥ निळा म्हणे जें जें कांहीं । भासे तेंही त्याचीं रुपें ॥४॥