भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझेंचि मज नवल वाटे । मीचि भेटें मजलागीं

majhenchi maj naval vate | michi bheten majalagin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
माझेंचि मज नवल वाटे । मीचि भेटें मजलागीं ॥१॥ निजात्मबोधें उदो केला । प्रकाश दाटला कोंदोनी ॥२॥ कोठें कांहिंचि न दिसे दुजें । निजात्मतेजें जग भासे ॥३॥ निळा म्हणे अवघे ठायीं । मीचि नाहीं दुजी परी ॥४॥