भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोहर्‍या पांवे तलालोरी

mohar‍ya panve talalori

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मोहर्‍या पांवे तलालोरी । नाचती गजरीं गीत गाती ॥१॥ शिंगें काहाळा मृदंग विणे । गाणें नाचणें निज छंदें ॥२॥ टिपरी घागर्‍या एकची घाई । उठिताती पायीं झणत्कार ॥३॥ निळा म्हणे रंगले रंगें । केलें श्रीरंगें आपणासें ॥४॥