भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणती आजि वांचिलों जीवें । जवळी श्रीहरी होतां सवें । तंव ते गांईचे मेळावें । वाडियाकडें मोहरले

mhanati aji vanchilon jiven | javali shrihari hotan saven | tanv te ganiche melaven | vadiyakaden moharale

रचनाकार: संत निळोबा · अभंग
म्हणती आजि वांचिलों जीवें । जवळी श्रीहरी होतां सवें । तंव ते गांईचे मेळावें । वाडियाकडें मोहरले ॥१॥ मग ते चालिले गोवर । वाजवीत वादयें खेळत खेळ । शिंगें कहाळा घागरघोळ । चांदिवे ध्वज उभारुनी ॥२॥ ऐशिया परमानंदकल्लोळीं । गाई आलिया वाडिया जवळी । तंव त्या गौळणी सकळी । आलिया दुडिया घेउनी ॥३॥ गौळी वत्सां पाचारिती । गोधना दुहावे ते करिती । गाई सुरवाडें दुभती । वत्सांही पाजिती तृप्तीवरी ॥४॥ संवगडे म्हणती चला घरां । जाऊं आतां शारंगधरा । मग मोहच्छायें मंदिरा । चालले गजरें मिरवत ॥५॥ तंव त्या तलगा गौळणी नारी । नानापरीच्या आरत्या करीं । घेऊनियां आत्मया श्रीहरी । ओवाळिती निजभावें ॥६॥ विचित्र पुष्पांचियां माळा । आवडी घालिती हरीच्या गळां । ऐसे मिरवित आले राउळा । येतां यशोदा देखिलें ॥७॥ तिणें करुनियां अंक्षवाणें । ओवाळिले जिवें मनें । तंव गोवळ बोलति बोलणें । जालें अपूर्व वनीं तें ॥८॥ निळा म्हणे तें ऐकवया । निवाडें बैसली यशोदा माया । गोवळ सांगती लगोनि पाया । थोर कौतुक देखिलें ॥९॥