भजनी मालिका
← भजनांकडे परत

मोकलितां धाय । नाईकसी कैसी माय

mokalitan dhay | naikasi kaisi may

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मोकलितां धाय । नाईकसी कैसी माय ॥१॥ सांडियले दूर देशीं । नये करुणा कांहीं ऐशी ॥२॥ वेष्टीलें श्वापदीं । अहंकार मोहमदीं ॥३॥ निळा म्हणे यावरी आई ॥ धांव घालीं वो विठाई ॥४॥