भजनी मालिका
← भजनांकडे परत

मृत प्राणी ते जीवविले । पुरुषहीं केले स्त्रियांचे

mrut prani te jivavile | purushahin kele striyanche

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मृत प्राणी ते जीवविले । पुरुषहीं केले स्त्रियांचे ॥१॥ हे तों तुमची सहजस्थिती । लोकांसी भक्ति प्रगटावया ॥२॥ प्रसादेंचि विधवेसी बाळ । जन्मविला केवळ भातलवंडा ॥३॥ निळा म्हणे तुमची करणी । देवाहुनी अधिक् ॥४॥