भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

सोडोनियां गळा मुक्त केले त्यांसी । पिऊनि उदकासी आली पुढती ॥१॥ क्षुधेलासी फार न लावीं उशीर । घेऊनिय़ां शस्त्र हाणी वेगें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सोनियाचीं झाडें अनेक कर्दळी । त्यांत रानकेळी फोंफावल्या ॥१॥ सिताफळी भरित अवघी तापीथडी । दाट दिसती गाढी रामफळें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सोपा ह सुगम उपावो परीस । धरीं तू विश्वास नाममहिमें ॥१॥ नाम हेंचि गंगा नाम हेंचि भीमा । अंतरीं श्रीरामा जपिजेसू ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सोपान म्हणे देवोत्तमा । पूर्वीं येथें होता ब्रह्मा । आणि तुम्हीं सर्वोत्तमा । कोणे स्थळीं होतां देवा ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

सोपान वटेश्वर पातले समोर । केला नमस्कार निवृत्तीसी ॥१॥ म्हणे मुक्ताबाई जाती दोघेजण । ऐसें नारायणें बुझाविलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सोपान वठेश्वर उभे ठेले पुढती । पंचारत्या होती आनंदाच्या ॥१॥ गंध आणि अक्षता वाहियेल्या सहज । देव निवृत्तिराज पूजियेले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सोपानदेवें ग्रंथ केला होता सार । ठेविला समोर निवृत्तीच्या ॥१॥ सवें मुक्ताबाई सद्‌गुरु निवृत्ति । लक्ष्मीचा पति घेतलिया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सोयरा सुखाचा विसावा भक्तांचा । विठोबा निजाचा मायबाप ॥१॥ कृपाळू दीनाचा बडिवार नामाचा । तोडर ब्रीदाचा साजे तया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सोयरिक सांडियली सर्वांची । जोडी केली विठ्ठलाची ॥१॥ लोभ सांडिला सर्वांचा । संग धरिला विठोबाचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सोळा त्या समाधि औट पीठा माझारी । तेथें नर- हरि देव नांदे ॥१॥ बारा गुंफे माजीं भ्रमर गुंफे मध्यें । तेथें आत्मा शुद्ध ज्ञान नांदे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सोळा सहस्र ताटें द्विजालागीं आलीं । अमृताची गेली चवी तेव्हां ॥१॥ पक्कान्नाचा तरी वाढवूं विस्तार । होईल उशीर कथेलागीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सोंवळीं पिळूनि कां घालिशी । मुद्रेनें आंग कां जा-ळिशी ॥१॥ कासया केली खोडी । काया विटंबिली बापुडी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सोवळ्यानें हरि वाढतो सकळां । मनींचा कळवळा कोण जाणे ॥१॥ रुक्माईचे कानीं सांगितली गोष्ट । विस्तारावें ताट ज्ञानदेवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

स्तवीनसे वाचे जोडोनियां कर । वेदां अगोचर ऐसें कांहीं ॥१॥ धन्य धन्य आतां उद्धरलों स्वभावें । माझें मज ठावें झालें निज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

स्त्री जन्म म्हणवुनी न व्हावें उदास । साधुसंतां ऐसें केलें जनीं ॥१॥ संतांचे घरची दासी मी अंकिली । विठोबानें दिल्ही प्रेमकळा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

स्नानविधि केलियां भक्तीं । नाममंत्राचिया आवृत्ति । मग प्रत्यक्ष पूजिली मूर्ति । विठोबची ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

स्नानालागीं उठा म्हणे नारायण । आणविलें उष्ण पाणी तेव्हां ॥१॥ सोळा सहस्र स्त्रिया उटणीं लाविती । अक्षवाण आरती करिताती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव