भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

संसार परजनीं । दूर दिधलें मज साजणी । द्वारकापुर पाटणीं । माझें माहियेर ॥१॥ थोर उत्कंठा मनीं । वाट पाहें प्रतिदिनीं । मज नेत कां न कोणी । तया माहियेरा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसार पाल्हाळ सांगसी परिकर । नाम तें श्रीधर न म्हणसी ॥१॥ कैसें तुज उद्धरण होईल गव्हारा । भजन त्या हरीहरी करी वेगीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसार शेत सुलभ थोर भूमी वाहिलीं नवही द्वारें । पांचही आउतें मेळवुनी तेथें जुंपियेली दोन्ही ढोरें । उखीतें करी येति जाती भारि नव्हती कोण्हि स्थिरें । बुनादि शेत वाहिलें तें काय सांगूं अपाररे ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

संसार सागरींरे । माझें माहेर पंढरपुरीं ॥ विठोबा बाप माझा । माता रखुमाई सुंदरी ॥१॥ पुंडलिक भाऊ माझा । तोही नांदे बरव्यापरी ॥ सासुरें दुर्बळ भारी । मज मोकलिलें दुरी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसारषड‌‍चक्रीं पडिलों महाडोहीं । सोडवणें येई पांडुरंगा ॥१॥ दवडादवडी धांव दवडादवडी धांव । नको भक्तिभाव पाहों माझा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसारसंकटें रिघालों पाठिसी । आतां झणीं देसी त्यांचे हातीं ॥१॥ ब्रीदें बडिवार ऐकोनियां फार । रिघों आम्ही द्वार विठोबाचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसारसागर भरला दुस्तर । विवेकी पोहणार विरला अंत ॥१॥ कामाचिया लाटा अंगीं आदळती । नेणों गेले किती पाहोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसारसागरीं पडलों महापुरीं । सोडवण करी देवराया ॥१॥ नामाची सांगडी देऊनियां मातें । वैकुंठावरूतें नेऊनि घाली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसाराचे सोये चुकले बापुडे । केशव मागें पुढें सांभाळित ॥१॥ आळीकर नामें खेळे महाद्वारीं । आंतून बाहेरी नवजे कांहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसाराबंधन केलें जेणें शून्य । तयासी अनन्य शरण रिघा ॥१॥ मायबाप सखा विठ्ठल विसांवा । त्याचे पायीं ठेवा सदा मन ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसारार्चे दु:खसुख ह्मणों नये । पुढें दु:ख पाहे अ-निवार ॥१॥ तया दु:खा नाही अतपार जाणा । काळाची यातना बहुतांपरी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसारीं असतां जीवन्मुक्त आह्मी । विठ्ठल हे नामीं वि-नटलें ॥१॥ काया क्लेश करणें शरीर दंडणें । न लगे हिंडणें दाही दिशा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसारी गांजलों म्हणोनि शरण आलों । पाठीसि रिघालों देवराया ॥१॥ कळिकाळा वास पाहूं तूं न देसी । भरंवसा मानसीं आहे मज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसारीं निधान लाधलें जनां । सद्‌गुरुचरणा सेवीं बापा ॥१॥ कायावाचामनें तयास देवात्रीं । वस्तु माणून ध्यावी अगोचर ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संसारींच्या आह्या आहाळलों भारी । निवावी गा श्रीहरि अमृतदृष्टी ॥१॥ मी अनाथ अपराधी दुर्बळ दुराचारी । कृपाळू बा हरी तारीं मज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सहसमुदायेंसी उठावें शारंगधरा । हरिहरेश्वरा जाऊं आतां ॥१॥ उठले विष्णव आणि ह्रषिकेशी । आले त्र्यंबकासी निवृत्तिराज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सहस्र तोंडांचा तोहि भागियेला । अंत नाहीं ज्याला गुणालागीम ॥१॥ तेथें मी पामर काय बोलूं वाणी । तुझी कीर्ति जनीं काय कैसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सहस्रअठयांशींऋषि । स्कंद उपदेशीं तयांसी । तिही एक पुसिली पुसी । ते तयासी अकळ ॥१॥ आतां जाऊं कैलासा । सकळ पुसूं त्या महेशा । मग निघाले आकाशा । पितृदेशा पातले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सहस्रदळांत आकाशाच्या परी । राहोनी शरीरीं शोभा दावी ॥१॥ तेंचि नटे थाटे उभा विटेवरी । कर कटावरी ठेऊनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव