भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसारषड‌‍चक्रीं पडिलों महाडोहीं । सोडवणें येई पांडुरंगा

sansarashad‌‍chakrin padilon mahadohin | sodavanen yei panduranga

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संसारषड‌‍चक्रीं पडिलों महाडोहीं । सोडवणें येई पांडुरंगा ॥१॥ दवडादवडी धांव दवडादवडी धांव । नको भक्तिभाव पाहों माझा ॥२॥ माझी चित्तवृत्ती अज्ञान हे गाई । व्याघ्रें धरिली आहे अहंकारें ॥३॥ पंचाननीं मज घेतलें वेढोनि । नेताति काढोनि प्राण माझा ॥४॥ गजेंद्राकारणें घातली त्वां उडी । तैसा लवडसवडी पावें मज ॥५॥ नामा म्हणे मज तुझाचि आधारा । पोसणा डिंगर जन्मोजन्मीं ॥६॥