भजनी मालिका
← भजनांकडे परत

सहस्रदळांत आकाशाच्या परी । राहोनी शरीरीं शोभा दावी

sahasradalant akashachya pari | rahoni sharirin shobha davi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सहस्रदळांत आकाशाच्या परी । राहोनी शरीरीं शोभा दावी ॥१॥ तेंचि नटे थाटे उभा विटेवरी । कर कटावरी ठेऊनियां ॥२॥ जयाचिये नाभीं जन्मला विधाता । तेथोनी वाढता लोक झाला ॥३॥ शुतीचिये वाचे नोहे गोचर । जेथें अवतार तिही देवा ॥४॥ नामा ह्मणे विश्वंभरू आणिक । अंगुळ दशक आहे जें कां ॥५॥