भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसार सागरींरे । माझें माहेर पंढरपुरीं ॥ विठोबा बाप माझा । माता रखुमाई सुंदरी

sansar sagarinre | majhen maher pandharapurin || vithoba bap majha | mata rakhumai sundari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संसार सागरींरे । माझें माहेर पंढरपुरीं ॥ विठोबा बाप माझा । माता रखुमाई सुंदरी ॥१॥ पुंडलिक भाऊ माझा । तोही नांदे बरव्यापरी ॥ सासुरें दुर्बळ भारी । मज मोकलिलें दुरी ॥२॥ सुख दु:ख कवणा सांगूं । माझें माहेर पंढरपुरीं ॥ध्रु०॥ भ्रतार निष्ठुर बो । काम क्रोध दोघे दीर ॥ आशा हे सासू माझी । ते मज गांजितसे थोर ॥३॥ तृष्णा हे नणंद सखी । तिनें व्यापियेले घरीं ॥ भक्ति हे माझी बहिणी । ते मज होईल निर्धारीं ॥४॥ वर्ष महिने दिवस घडिया । बाट पाहे अझुमी ॥ देहामाजी करिती देखा । न्यावया न पवे कोणी ॥५॥ गजेंद्र हरिश्चंद्र त्यासी । सोडावया आला । प्र-र्‍हाद अंबऋषि । तिहीं तुझा धांवा केला ॥६॥ उपमन्यु दूध मागतां । क्षीरसागरु दिल्हा ॥ गजेंद्र अजामेळ । त्यांच्या सत्वा तूं पावला ॥ नामया विष्णुदास गीतीं गोविंदु गाइला ॥७॥