भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसाराचे सोये चुकले बापुडे । केशव मागें पुढें सांभाळित

sansarache soye chukale bapude | keshav magen pudhen sambhalit

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संसाराचे सोये चुकले बापुडे । केशव मागें पुढें सांभाळित ॥१॥ आळीकर नामें खेळे महाद्वारीं । आंतून बाहेरी नवजे कांहीं ॥२॥ संतांसी देखोनी मिठी घाली चरणीं । कुरवंडी करूनी देह टाकी ॥३॥ ऐसें निज बोधें राहिले निवांत । नामा एकुलते केशवचरणीं ॥४॥