भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्नानालागीं उठा म्हणे नारायण । आणविलें उष्ण पाणी तेव्हां

snanalagin utha mhane narayan | anavilen ushna pani tevhan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
स्नानालागीं उठा म्हणे नारायण । आणविलें उष्ण पाणी तेव्हां ॥१॥ सोळा सहस्र स्त्रिया उटणीं लाविती । अक्षवाण आरती करिताती ॥२॥ करविलें स्नान पतिबंर परिधान । अलंकार भूषणें दिल्हीं त्यासीं ॥३॥ स्वइच्छा भोजन वाढिलें तयासी । नामाही पंक्तिसी बैसविला ॥४॥